फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन केल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेल्या परिणामांचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘२९.१२.२०२१ आणि ३०.१२.२०२१ या दिवशी श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी विविध लयीत सतारवादन केल्यावर ‘त्याचा वाईट शक्तींचा त्रास असणार्या आणि नसणार्या साधकांवर झालेला परिणाम’ यांचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
१. श्री. सहस्रबुद्धे यांनी विविध लयींत सतारवादन केल्यावर सतारीतून प्रक्षेपित झालेले विविध घटक
विलंबित लयीत (संथ लयीत) दोन्ही वाद्यांतून निर्गुण-सगुण स्तरावरील तारक शक्ती प्रक्षेपित झाली, मध्य लयीत (मध्यम लयीत) भाव आणि चैतन्य अन् द्रुत लयीत (जलद लयीत) सगुण-निर्गुण स्तरावरील मारक शक्ती, तसेच आनंद यांच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण झाले.
१ अ. श्री. सहस्रबुद्धे यांनी सतार विलंबित, मध्य आणि द्रुत लयीत वाजवल्यावर वाद्यांतून प्रक्षेपित झालेल्या विविध घटकांचे प्रमाण
टीप – श्री. सहस्रबुद्धे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्यामुळे त्यांनी केलेल्या सतारवादनातून शक्ती आणि भाव अल्प प्रमाणात अन् चैतन्य, आनंद आणि शांती अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली.
२. विविध लयीत सतारवादन केल्यावर प्रयोगाला उपस्थित असणार्या साधकांवर झालेला परिणाम
२ अ. वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांवर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
२ आ. वाईट शक्तींचा त्रास नसणार्या साधकांवर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
टीप – श्री. सहस्रबुद्धे यांनी तीन लयींत सतार वाजवल्याचा परिणाम संगीत प्रयोगाला उपस्थित असणार्या साधकांवर समान प्रमाणात झाला. सतारवादनाच्या प्रयोगाला उपस्थित असणार्या साधकांवर सतारवादनाचा समान प्रमाणात परिणाम झाला; परंतु त्यांना वाईट शक्तींचा त्रास असणे किंवा नसणे यांनुसार सतारवादनाच्या परिणामाचे स्वरूप निरनिराळे होते, हे वरील दोन सारणींतून लक्षात आले.
२ इ. श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी केलेल्या सतारवादनाच्या प्रयोगाला उपस्थित असणार्या त्रास असलेल्या आणि नसलेल्या साधकांच्या सप्त कुंडलिनीचक्रांवर झालेला परिणाम
टीप – श्री. सहस्रबुद्धे यांनी वाजवलेल्या सतारीतून अधिक प्रमाणात तेज, वायु आणि आकाश या तत्त्वांचे प्रक्षेपण झाल्यामुळे या तत्त्वांशी संबंधित असणार्या अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार या कुंडलिनीचक्रांवर सतारीच्या नादाचा अधिक परिणाम झाल्याचे जाणवले. त्यांच्या सतार वादनातून पृथ्वी आणि आप ही तत्त्वे अल्प प्रमाणात प्रक्षेपित झाल्यामुळे या तत्त्वांशी संबंधित असणार्या मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर या कुंडलिनीचक्रांवर सतारवादनाचा अल्प परिणाम झाल्याचे जाणवले.
३. श्री. सहस्रबुद्धे यांनी सतारीवर ‘राग भैरवी’ वाजवल्याने श्री भैरवीदेवीची प्रकट स्तरावरील मारक शक्ती प्रक्षेपित होऊन साधकांचा वाईट शक्तींचा त्रास न्यून होणे
श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी ३०.१२.२०२१ या दिवशी सतारीवर ‘राग भैरवी’ वाजवला होता. तेव्हा हा संगीताचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे अशा दोन्ही प्रकारच्या साधकांवर घेण्यात आला. तेव्हा या रागामध्ये कार्यरत झालेली ‘श्री भैरवीदेवी’ची प्रकट मारक शक्ती प्रयोगाला उपस्थित असणारे आणि वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांच्या दिशेने प्रक्षेपित झाली. त्यामुळे त्यांना होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून झाला.
कृतज्ञता
‘श्रीगुरुकृपेमुळे सतारीच्या प्रयोगाच्या वेळी मला सूक्ष्म स्तरावरील सूत्रे अनुभवण्यास मिळाली आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र उमजले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |