पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू असणारा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा मोठा भाऊ शाहिद अख्तर याच्या अंत्ययात्रेच्या वेळी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी उपस्थित होते, असे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले आहेत. यात लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसूरी आणि पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग (पी.एम्.एम्.एल्.) या पक्षाशी संबंधित काही नेते उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र या व्हिडिओला दुजोरा मिळू शकलेला नाही. सैफुल्ला कसूरी २२ एप्रिल २०२५ या दिवशी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या कटामध्ये सहभागी होता. पी.एम्.एम्.एल्. पक्षावर बर्‍याच काळापासून आरोप होत आले आहेत की, हे लष्कर-ए-तोयबाशी संबंधित लोकांचे राजकीय व्यासपीठ आहे.

आतापर्यंत शोएब अख्तर किंवा त्याच्या कुटुंबाकडून या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दुसरीकडे पाकिस्तान सरकारनेही व्हिडिओविषयी कोणतेही विधान केलेले नाही.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताविरुद्ध सामना खेळतांना जिहाद करत असल्याच्याच मानसिकतेतून खेळत असतात. त्यामुळे जर आतंकवाद्यांशी त्यांचे संबंध असतील, तर त्यात आश्चर्य काय ?