धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !

  • धर्मांधांचा बंदोबस्त करणार असल्याची ‘हिंदु एकता आंदोलना’ची चेतावणी !

  • मशिदीत परराज्यांतील मुसलमानांचा सुळसुळाट !

AI निर्मित चित्र

सांगली, २७ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील बिसूर गावामध्ये मशिदीत येणार्‍या परराज्यांतील आणि बाहेरील जिल्ह्यांतील धर्मांधांमुळे स्थानिक हिंदु कुटुंबे अत्यंत भयाच्या सावटाखाली वावरत आहेत. मशिदीच्या शेजारी रहाणार्‍या हिंदूंचा छळ करणे, हिंदु महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करणे आणि हिंदु धर्माविषयी गरळ ओकणे, असे संतापजनक प्रकार या धर्मांधांकडून चालू आहेत. या त्रासाला कंटाळून गावातील १० हिंदु कुटुंबे त्यांचे घर सोडून गावातून पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत.

मशिदीच्या आडोशाने हिंदूंचा छळ !

बिसूर गावातील मशिदीमध्ये बाहेरून आणि परराज्यातून २०-२० जणांच्या टोळ्या येत आहेत. मशिदीच्या शेजारी रहाणार्‍या हिंदूंची शांतता आणि सुरक्षा यांना धोका निर्माण झाला आहे. स्थानिक मुसलमान शेख, नदाफ, सय्यद आणि बाहेरील राज्यांतून आलेले हाफीज हे मशिदीमध्ये जोरात बोलणे, तसेच भ्रमणभाषवर मोठ्या आवाजात गाणी वाजवून हिंदूंना त्रास देणे, असे प्रकार करत आहेत. मशिदीच्या परिसरातून ये-जा करणार्‍या हिंदु महिला आणि मुली यांच्याकडे पाहून हे धर्मांध अश्लील हावभाव करतात, तसेच हिंदु धर्माविषयी अत्यंत हीन पातळीवर जाऊन अपशब्द वापरतात.

त्रास होत असेल, तर दारे-खिडक्या बंद करून आत बसा ! – हिंदूंना धमकी

जेव्हा पीडित हिंदु कुटुंबियांनी या उद्धट वर्तनाचा प्रतिकार केला, तेव्हा ‘त्रास होत असेल, तर तुमची दारे-खिडक्या बंद करून आत बसा’, अशा धमक्या धर्मांधांनी हिंदूंना दिल्या. गावचे पुढारी, नेतेमंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याकडे हिंदूंनी वारंवार तक्रारी करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

बाहेरील व्यक्तींची चौकशी करा ! – हिंदु एकता आंदोलनाची मागणी

हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे

या गंभीर परिस्थितीची नोंद घेत ‘हिंदु एकता आंदोलना’चे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

‘बिसूर गावातील मशिदीत बाहेरील राज्यातून आणि जिल्ह्यांतून येणारे संशयास्पद लोक कोण आहेत ? त्यांची तात्काळ सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यामुळे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्हा पोलीस प्रमुखांनी यात वैयक्तिक लक्ष घालून पीडित हिंदु कुटुंबांना संरक्षण दिले पाहिजे आणि त्यांचे पलायन रोखले पाहिजे. जर पोलिसांनी वेळेत कायदेशीर कारवाई केली नाही, तर त्या मुसलमान जमातीचा बंदोबस्त हिंदु एकता आंदोलनाचे पदाधिकारी आपल्या पद्धतीने करतील’, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी दिली आहे.

या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे श्री. दत्तात्रय भोकरे, शहराध्यक्ष श्री. अनिरुद्ध कुंभार, पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे, सोमनाथ गोटखिंडे, प्रसाद रिसवडे, भूषण गुरव, दिग्विजय शिंदे, गजानन माने, हरपितसिंग गौड, सुमित शिंगे, अनिकेत आंबरुळे, अवधूत जाधव, राजू जाधव, राम काळे, अक्षय पवार, कृष्णा नायडू आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंना पलायन करावे लागायला बिसूर गाव भारतात आहे कि पाकिस्तानात ?  हिंदूंना सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !
  • या प्रकरणी निष्क्रीय असणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करायला हवी !