
पॅरिस (फ्रान्स) – युरोपमध्ये सध्या भीषण उष्णतेची लाट चालू आहे. तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक झाले आहे. आता फ्रान्सच्या रॉबेरी शहरात वातानुकूलित यंत्र (एसी – एअर कंडिशनर) विकत घेण्यासाठी गर्दी होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, जसे दुकानाचे दार उघडले, तसे बाहेर थांबलेले लोक थेट आत पळू लागले. एसी आणि कुलर मिळवण्यासाठी ग्राहकांमध्ये अक्षरशः चढाओढ चालू झाली. काही वेळातच स्टोअरच्या आत मोठा गोंधळ उडाला. लोक एकमेकांना बाजूला सारून एसीचे बॉक्स उचलण्याचा प्रयत्न करत होते. या व्हिडिओवरून फ्रान्समधील उष्णतेची तीव्रता किती भयंकर आहे ?, याचा अंदाज लावता येतो.
युरोपमधील इतर देशांची स्थिती
केवळ फ्रान्सच नाही, तर ब्रिटन, इटली आणि स्पेन यांसारख्या युरोपातील इतर देशांनाही या उष्णतेच्या लाटेचा तीव्र फटका बसला आहे. या देशांमध्ये एरवी एवढी प्रदीर्घ आणि प्रखर उष्णता जाणवत नाही; मात्र जागतिक तापमानवाढीमुळे आता युरोपमधील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांसमोर थंडावा देणार्या उपकरणांचा आधार घेण्यावाचून दुसरा पर्याय नाही.
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
US-Iran Ceasefire : इराणने व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेकडून इराणच्या सैन्यातळांवर आक्रमण
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !