मद्रास उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
जन्मत: मागासवर्गीय हिंदु कुटुंबातील व्यक्तीला धर्मांतरानंतर मागासवर्गीय मुसलमान म्हणून आरक्षणाचे लाभ मिळवण्याचा अधिकार नाही !

चेन्नई (तमिळनाडू) – केवळ इस्लाम धर्म स्वीकारल्याने एखादी व्यक्ती ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जाचा दावा करू शकत नाही. धर्मांतराद्वारे एखादी व्यक्ती मुसलमान बनू शकत असली, तरी केवळ आरक्षणाचे लाभ मिळवण्याच्या उद्देशाने विशिष्ट मुसलमान समुदायाचे सदस्यत्व असल्याचा दावा करणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले.
तमिळनाडू सरकारचा आदेश घटनाबाह्य !
याद्वारे न्यायमूर्ती जी.आर्. स्वामीनाथन् आणि न्यायमूर्ती पी.बी. बालाजी यांच्या खंडपिठाने तामिळनाडू सरकारचा ९ मार्च २०२४ या दिवशी दिलेला सरकारी आदेश घटनाबाह्य ठरवला. त्या आदेशात असे प्रावधान होते की, मागासवर्ग, अती मागासवर्ग, विमुक्त जमाती किंवा अनुसूचित जाती प्रवर्गांतील कोणतीही व्यक्ती इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर ‘मागासवर्गीय मुसलमान’ प्रवर्गात वर्गीकृत केली जाऊ शकते. समीर अहमद याने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी हा निकाल देण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
१. तुतिकोरिन जिल्ह्यातील रहिवासी समीर अहमद हा जन्माने हिंदु असून त्याने वर्ष २०१५ मध्ये इस्लाम स्वीकारला. यानंतर त्याने ‘मुसलमान लेब्बाई’ समुदायाचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला.
२. राज्यात ‘लेब्बाई’ समुदाय मागासवर्गीय मुसलमान श्रेणीत मोडतो.
३. स्थानिक तहसीलदारांनी मात्र समीर अहमद याचा अर्ज फेटाळला. यामुळे अहमद याने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.
४. अहमदचा युक्तीवाद : वर्ष २०२४ च्या एका सरकारी आदेशाचा संदर्भ देत याचिकाकर्त्याने असा युक्तीवाद केला की, आरक्षित श्रेणीतील जे लोक इस्लाम स्वीकारतात, ते मागासवर्गीय मुसलमान समुदायाचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यास पात्र असतात.
५. तमिळनाडू सरकारचा युक्तीवाद : राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, संबंधित आदेश तामिळनाडू मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींवर आधारित होता. धर्मांतरापूर्वी ज्या व्यक्तींना आरक्षणाचे लाभ मिळत होते, त्यांना इस्लाम स्वीकारल्यानंतरही ते लाभ कायम मिळावेत, हा त्यामागचा उद्देश होता.
उच्च न्यायालयाच्या निरीक्षणातील महत्त्वाचे पैलू !१. न्यायालयाने राज्याचा युक्तीवाद फेटाळून लावत स्पष्ट केले की, सरकारी आदेश हा पूर्वीच्या न्यायालयीन निकालापेक्षा वरचढ ठरू शकत नाही. ‘जी. मायकल विरुद्ध एस्. व्यंकटेश्वरन्’ या खटल्यातील वर्ष १९५१ च्या निकालाचा संदर्भ देत न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, इस्लाम स्वीकारल्यानंतर एखाद्या व्यक्तीची ओळख केवळ ‘मुसलमान’ अशीच असते; मुसलमान समाजातील त्यांचा दर्जा ते ज्या (हिंदु) जातीत किंवा समुदायात जन्माला आले होते, त्यावरून ठरवला जात नाही. २. जरी मुसलमान समाजात ‘राउथर’, ‘मरक्कर’, ‘लेब्बाई’, ‘दख्खनी’ यांसारखे विविध समुदाय असले, तरी या समुदायांचे सदस्यत्व जन्माद्वारे प्राप्त होते, धर्मांतराद्वारे नाही. परिणामी केवळ आरक्षणाचे लाभ मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती विशिष्ट मुसलमान समुदायात धर्मांतरित झाल्याचा दावा करू शकत नाही. ३. विविध पार्श्वभूमी असलेल्या धर्मांतरितांना एकत्र करून त्यांना ‘मागासवर्गीय मुसलमान’ श्रेणीत समाविष्ट करणे, हा मनमानीपणा आहे. त्याला कोणताही घटनात्मक किंवा कायदेशीर आधार नाही. अशा प्रकारच्या वर्गीकरणामुळे कायद्याचे राज्य आणि न्यायपालिकेचे अधिकार कमकुवत होतात. ४. इस्लामचे मूळ तत्त्वज्ञान हे सामाजिक समता प्रस्थापित करणे, हे आहे. इस्लाम जन्मावर आधारित भेदभाव किंवा सामाजिक स्तरीकरणाचे समर्थन करत नाही. त्यामुळे संबंधित सरकारी आदेश केवळ घटनाबाह्यच नाही, तर इस्लामच्या मूलभूत तत्त्वांच्याही विरोधात आहे. ५. न्यायालयाने तहसीलदारांचा निर्णय कायम ठेवत याचिकाकर्त्याचा ‘मुसलमान लेब्बाई’ समाजाच्या प्रमाणपत्रासाठीचा अर्ज फेटाळून लावला. |
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !