सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्थुलातील अस्तित्वाचे अनन्यसाधारण महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे सध्याचे कार्य ३० टक्के स्थुलातील, तर ७० टक्के सूक्ष्मातील आहे. यावरून त्यांच्या स्थुलातील अस्तित्वामुळे सूक्ष्मातील केवढे मोठे कार्य होत असेल, याची कल्पना येते.

साधकांनी गुरूंकडे कोणत्या दृष्टीने पहावे ?

गुरूंविषयी विकल्प आल्यास साधकांची साधनेत मोठी हानी होते. असे होऊ नये, यासाठी साधकांनी शक्य असल्यास गुरूंना किंवा त्यांना विचारणे शक्य नसल्यास उन्नत साधकांना स्वत:च्या मनातील शंका मोकळेपणाने अन् शिकण्याच्या स्थितीत राहून विचारावी.

‘संयम ठेवून यशाची वाट पहाणे’ ही तपश्चर्याच आहे !

‘काही साधक काही वर्षे साधना करत असूनही अपेक्षित अशा आध्यात्मिक प्रगतीच्या स्वरूपात यशाची प्राप्ती होतांना त्यांना दिसत नाही. त्यामुळे काही वेळा ते निराश होतात किंवा ‘आता माझ्या साधनेने माझी प्रगती होऊ शकते’ असा त्यांचा आत्मविश्वासच न्यून व्हायला लागतो…..

खरे अध्‍यात्‍म !

साधना वाढली की, पुढे पुढे ‘देवच माझ्‍यातून सर्व करत आहे’, अशी अनुभूती येते. ‘देवाची अनुभूती घेणे, म्‍हणजेच देवाला अनुभवणे’, हेच खरे अध्‍यात्‍म आहे !’

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या एक अलौकिक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंचा अध्‍यात्‍मातील असामान्‍य अधिकार पुष्‍कळ आधीच ओळखणारे महान सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्‍यांचे बोल खरे करणार्‍या महान श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई !

स्‍वतःचा वेळ वाया घालवणे, हे देवाचा वेळ वाया घालवण्‍यासारखे आहे !

‘देवाने आपल्‍याला साधनेसाठी पृथ्‍वीवर जन्‍म दिला आहे; मात्र काही साधक अनावश्‍यक विषयांवर बोलणे, भ्रमणभाषवर (मोबाईलवर) गप्‍पा मारणे, भ्रमणभाष किंवा दूरचित्रवाणी संच (टीव्‍ही) यांवर मनोरंजनपर कार्यक्रम पहाणे इत्‍यादींमध्‍ये वेळ वाया घालवतात.

साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व

‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्‍या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्‍याला साधनेत पुढे जाण्‍यासाठी अधिक योग्‍य असतात.

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पण आरोग्याविषयी चिंताही करू नका !

आरोग्याविषयी चिंता करू नये; अन्यथा चिंतेचा, म्हणजेच मानसिकदृष्ट्या खचल्याचा परिणाम म्हणूनही शारीरिक आरोग्य बिघडू शकते. यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.

संत किंवा उत्तरदायी साधक यांनी चुका सांगण्यामागील दृष्टीकोन समजून घ्या !

साधकांनी त्यांना जमते त्यापेक्षा अधिक, परिपूर्ण आणि दायित्व घेऊन सेवा केल्याने त्यांची सेवेची फलनिष्पत्ती वाढून साधनेत लवकर प्रगती होते; म्हणून संत किंवा उत्तरदायी साधक हे साधकांना चुका सांगतात आणि त्यांच्या सेवांचा आढावा घेतात.

साधकांनो, ‘सनातन प्रभात’मधून आपले सर्व लिखाण प्रसिद्ध झाले नाही’, असे वाटून नापसंती न दर्शवता ‘आवश्‍यक ती सूत्रे प्रसिद्ध होत आहेत’, यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञता बाळगा !

‘सनातनच्‍या साधकांसाठी ‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नसून जणू ‘गुरुदेवांचे संदेशपत्र’च आहे. ‘सनातन प्रभात’मधून साधकांना साधनेची दिशा मिळते, त्‍यासमवेत साधनेतील अडथळ्‍यांवर उपाय, तसेच भाववृद्धीचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शनही मिळते.