सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्थुलातील अस्तित्वाचे अनन्यसाधारण महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकदा रामनाथी आश्रमात चंडीयाग झाला होता. मी आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी त्या यागाला बसलो होतो. साधारण दीड घंटे मी नामजप करत होतो. तेव्हा मला आध्यात्मिक लाभ झाले. यानंतर प्राणशक्ती अल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले अर्धा घंटा यागाच्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्या अर्ध्या घंट्यात मला आधीच्या दीड घंट्यांच्या तुलनेत पुष्कळ अधिक आध्यात्मिक लाभ झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या स्थुलातील अस्तित्वाचे महत्त्व पुन्हा एकदा या उदाहरणावरून लक्षात आले.

पू. संदीप आळशी

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे सध्याचे कार्य ३० टक्के स्थुलातील, तर ७० टक्के सूक्ष्मातील आहे. यावरून त्यांच्या स्थुलातील अस्तित्वामुळे सूक्ष्मातील केवढे मोठे कार्य होत असेल, याची कल्पना येते. नाडीपट्टी वाचनाच्या माध्यमातून महर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या स्थुलातील अस्तित्वामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, असे का सांगितले आहे, हेही लक्षात येते. हे सर्व आठवून माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’

– पू. संदीप आळशी (१५.५.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक