साधकांनी गुरूंकडे कोणत्या दृष्टीने पहावे ?

पू. संदीप आळशी

‘काही वेळा गुरु जे काही करतात किंवा साधकांना करायला सांगतात, त्याविषयी साधकांच्या मनात शंका निर्माण होतात. साधकांच्या शंकांचे निरसन न झाल्यास त्यांना गुरूंनी सांगितलेले मनापासून स्वीकारता येत नाही किंवा त्यांना गुरूंविषयी विकल्प येतो. गुरूंविषयी विकल्प आल्यास साधकांची साधनेत मोठी हानी होते. असे होऊ नये, यासाठी साधकांनी शक्य असल्यास गुरूंना किंवा त्यांना विचारणे शक्य नसल्यास उन्नत साधकांना स्वत:च्या मनातील शंका मोकळेपणाने अन् शिकण्याच्या स्थितीत राहून विचारावी. त्यावर गुरु किंवा उन्नत साधक जे सांगतील ते शिकण्याच्या स्थितीत राहून स्वीकारावे आणि त्याप्रमाणे करावे. गुरु किंवा उन्नत साधक यांना स्वत:ची शंका विचारणे शक्य नसेल, तर ‘गुरु काय करतात किंवा करायला सांगतात ?’, याचे कारण शोधायचा प्रयत्न करू नये किंवा स्वतःच काहीतरी निष्कर्ष काढू नये. यापेक्षा ‘गुरु जे सांगतात’, ते आज्ञापालन म्हणून करावे. यामुळे साधकांच्या आज्ञाचक्राचा भेद होऊन त्यांची साधनेत लवकर प्रगती होते.’

– (पू.) संदीप आळशी (२०.१०.२०२३)