सकारात्मक राहून प्रसंगातून शिकणारे आणि अभ्यासपूर्ण सेवा करणारे ऋषितुल्य सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७१ वर्षे) !

उद्या ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (२८.५.२०२३) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. प्रशांत जुवेकर आणि अन्य साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सद्गुरु नंदकुमार जाधव घेत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपाय सत्संगामुळे साधकाला झालेले लाभ आणि त्याने अनुभवलेली गुरुकृपा !

‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सत्संग घेण्याच्या आधीपासून साधक वैयक्तिक स्तरावर नामजपादी उपाय करत होते. त्याचा लाभ होतच होता; मात्र सद्गुरु जाधवकाकांनी नियमितपणे चालू केलेल्या उपाय सत्संगामुळे या जिवाला ‘न भूतो न भविष्यति !’ असे लाभ झाले.

सगुणातील सद्गुरु माऊली नंदकुमार जाधवकाका ।

सगुणातील गुरुमूर्ती तू सद्गुरु माऊली । आनंदमाचा सागर तू सद्गुरु माऊली ।।

ज्ञानमार्गी संत पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या वाणीतील चैतन्यामुळे वाईट शक्तीवर परिणाम होऊन ती नष्ट होणे

‘२९.५.२०२२ या दिवशी ‘ज्ञानमार्गी संतांच्या वाणीतील चैतन्याचा वाईट शक्तींवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या मार्गदर्शनाचा प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

पू. सत्यनारायण तिवारीकाका यांनी वर्ष २०१९ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. त्यानंतर वर्ष २०२२ जुलैच्या मासापर्यंत त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्केच होती.

पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

‘पू. सत्यनारायण तिवारीकाका हे सनातनच्या १२४ व्या संतपदी विराजमान झाले’. या संतसोहळ्याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण लेखबद्ध करूत हा लेख कृतज्ञताभावाने पुष्पांच्या स्वरूपात पू. सत्यनारायण तिवारी यांच्या सुकोमल चरणी अर्पण करत आहे.

पू. सत्यनारायण तिवारी यांच्या संत सन्मानसोहळ्याच्या वेळी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि बाबा यांच्यात चैतन्याच्या स्तरावर संवाद होत होता. तेथे शारीरिक आणि मानसिक या स्तरांवर काहीच नव्हते. ‘सोहळा आणि त्यातील संवाद आध्यात्मिक स्तरावर असल्याने बाबा बसू शकले’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर स्वतःत आमूलाग्र पालट करून संतपद गाठलेले फोंडा (गोवा) येथील सनातनचे १२४ वे संत पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) !

मूळ संभाजीनगर येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले श्री. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी संतपदी विराजमान झाले. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी आणि मुलगी यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

पू. सत्यनारायण तिवारी यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती  

‘२३.४.२०२३ या दिवशी श्री. सत्यनारायण तिवारी संतपदी विराजमान झाले आहेत’, असे घोषित केले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला त्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी लाभली. तेव्हा मी अनुभवलेले काही भावक्षण येथे दिले आहेत.

पू. सत्यनारायण तिवारी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यावर होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी यांना झालेले त्रास !

‘२३.४.२०२३ या दिवशी माझे बाबा (श्री. सत्यनारायण तिवारी) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ‘पू. बाबांच्या संत सन्मान सोहळ्यानंतर ३ दिवस मला अखंड चैतन्य लाभले’, असे मला जाणवले. त्या वेळी मला झालेले त्रास येथे दिले आहेत.