पू. सत्यनारायण तिवारी यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती  

‘२३.४.२०२३ या दिवशी श्री. सत्यनारायण तिवारी संतपदी विराजमान झाले आहेत’, असे त्यांच्या घरी एका घरगुती कार्यक्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला त्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी लाभली. तेव्हा मी अनुभवलेले काही भावक्षण येथे दिले आहेत.

पू. सत्यनारायण तिवारी

१. त्या वेळी वातावरण प्रसन्न होते. ‘मी चैतन्यात आहे’, याची मला जाणीव होत होती.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश वाचून पू. सत्यनारायण तिवारी यांच्या संतपदाची घोषणा केली. तेव्हा पू. सत्यनारायण तिवारी स्थिर होते.

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी

३. पू. सत्यनारायण तिवारीकाकांची सोहळ्याच्या वेळी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

अ. पू. तिवारीकाकांची सहजता उन्नत व्यक्ती किंवा संत यांच्याप्रमाणे होती. ते अवलिया संतांप्रमाणे (परमहंस भालचंद्र महाराज, कणकवली आणि श्री संत गजानन महाराज, शेगाव यांच्याप्रमाणे) वाटत होते.

आ. त्यांची दृष्टी स्थिर होती. त्यांच्या डोळ्यांत विलक्षण तेज होते.

इ. ते ‘परमेश्वराच्या चिंतनात मग्न आहेत’, असे वाटत होते.

ई. ते जे बोलत होते, त्यात गूढार्थ होता.’

पू. सत्यनारायण तिवारी यांचा साधनाप्रवास !

१. पू. तिवारी यांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) कमालीची ओढ आहे. व्यक्तीच्या शरिराची स्थिती जेव्हा तिच्या नियंत्रणात नसते, तेव्हा गुरुच सर्वांतून तारून नेतात आणि तिचे जीवन सुसह्य करतात अन् तिची आध्यात्मिक उन्नती करून घेतात.

२. पू. सत्यनारायण तिवारी यांनी ईश्वर, गुरु आणि कुटुंबातील व्यक्ती यांची क्षमा मागणे : ते त्यांच्या परीने साधनेचे प्रयत्न करत असतांना त्यांना स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी अधिक खंत वाटत असे. त्यांच्या कुटुंबाविषयीच्या चुका मर्यादित असल्या, तरी ते ईश्वर, गुरु आणि कुटुंबातील व्यक्ती यांची क्षमा आर्ततेने मागत असत. हीच त्यांची आंतरिक साधना होती. कुटुंबातील व्यक्तींच्या माध्यमातून त्यांना सच्चिदानंद परब्रह्म यांच्याविषयी आवड निर्माण झाली.

३. पू. सत्यनारायण तिवारी नागेशी, गोवा येथे रहायला आल्यावर त्यांच्यात आश्रमातील चैतन्यामुळे झालेले पालट : मे २०२१ मध्ये त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे तेथे रक्तप्रवाह होत नव्हता. त्यांच्या मेंदूला इजा झाल्याने त्यांची चिडचिड होऊ लागली. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘यांची अकारण हिंसक वृत्ती वाढेल, प्रकृती खालावेल आणि ते केव्हाही प्राणास मुकू शकतील.’’ याचा त्रास कुटुंबियांना होत असे. अशा बिकट समयी त्यांना जून २०२२ या दिवशी नागेशी, फोंडा, गोवा येथे त्यांच्या घरी आणण्यात आले. तेथून जवळच २ कि.मी. अंतरावर रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम आहे. पू. तिवारीकाकांची मुलगी कु. आरती आणि पत्नी (सौ. सविता तिवारी) काकांची सेवा करत झेपेल तशी साधना करत आहेत. पू. काका येथे वास्तव्याला आल्यानंतर २ दिवसांतच पू. काकांच्या वागण्यात पालट झाला. त्यांची अस्वस्थता आणि चिडचिड दूर झाली. त्यांना विस्मृती झाल्याने ते त्यांची मुलगी आणि पत्नी यांना ओळखत नसत. ते गोव्यात रहायला आल्यानंतर मधून मधून त्यांची मुलगी आणि पत्नी यांना ओळखायला लागले. त्यांच्या स्वभावातील रुक्षपणा जाऊन मार्दवता आली. ते नम्रतेने वागू लागले.

४. पू. सत्यनारायण तिवारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा

अ. पू. सत्यनारायण तिवारी यांच्या कुटुंबियांचा ईश्वरी कार्यात त्याग असल्याने ‘त्यांना आश्रमाजवळ रहायला जावे’, असे वाटले.

आ. ते आश्रमाजवळ रहायला आल्यामुळे आणि तेथील महाप्रसाद प्रतिदिन ग्रहण करत असल्याने त्यांच्या व्याधी न्यून झाल्या. आश्रमातील चैतन्यामुळेच पू. काकांच्या स्वभावात पालट झाला. पू. काकांचे त्रास न्यून झाले, म्हणजे कुटुंबाचे प्रारब्ध न्यून झाले.’

– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२३)

पू. सत्यनारायण तिवारी यांच्या उदाहरणातून मिळालेला बोध !

१. ‘साधनेमुळे व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो.

२. या कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे त्याग आणि श्रद्धा हवी.

३. परिस्थिती बिकट असली, तरीही त्यांच्याप्रमाणे साधना करावी.

४. पू. काका प्रामाणिक आहेत आणि त्यांची आंतरिक साधना आहे. त्यामुळे त्यांची अध्यात्मात प्रगती झाली. आपण सर्वांनी आंतरिक साधनेला महत्त्व दिले, तर आपण पू. काकांसारखी साधना करू शकतो. त्याचा आपल्याला लाभही मिळेल.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांची काळजी घेतात.

गुरुदेवांनी ही सूत्रे सुचवली, त्याबद्धल कोटीशः कृतज्ञता !  ‘मला या संतसन्मान सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (२४.४.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक