‘२३.४.२०२३ या दिवशी माझे बाबा (श्री. सत्यनारायण तिवारी) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ‘पू. बाबांच्या संत सन्मान सोहळ्यानंतर ३ दिवस मला अखंड चैतन्य लाभले’, असे मला जाणवले. त्या वेळी मला झालेले त्रास येथे दिले आहेत.
१. आरंभी मला २ दिवस अखंड भावावस्था अनुभवायला आली; परंतु तिसर्या दिवशी म्हणजे २६.४.२०२३ या दिवशी रात्री मला अकस्मात् पुष्कळ उलट्या झाल्या. माझे डोके पुष्कळ दुखू लागले. ‘माझे डोके कुणीतरी गच्च दाबून ठेवले आहे’, असे मला जाणवत होते. मी झोपले किंवा बसले, तरीही मला अस्वस्थ वाटत होते.
२. दुसर्या दिवशी सकाळी मला इतका थकवा आला की, मला काहीच करता येत नव्हते आणि बोलता येत नव्हते.
३. गुरुवारी दुपारी भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे बोलणे ऐकतांना मला पुष्कळ ग्लानी येत होती. भक्तीसत्संग संपल्यावर २ घंट्यांनी मला थोडे बरे वाटले.
४. २८.४.२०२३ या दिवशी पू. बाबांच्या सहवासात नामजप करतांना मला थकवा आणि ग्लानी आली.
‘हे गुरुराया, तू माझा त्रास दूर करण्यासाठी माझ्यावर पुष्कळ कृपा करत आहेस. ‘तुला अपेक्षित अशी सेवा तूच माझ्याकडून करून घे’, अशी तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (पू. तिवारीकाकांची मुलगी), फोंडा, गोवा. (२८.४.२०२३)
|