चि. संदीप शिंदे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
समष्टी प्रकृतीचे आणि सेवेशी संबंधित अनेक कौशल्ये आत्मसात करणारे श्री. संदीप शिंदे !
समष्टी प्रकृतीचे आणि सेवेशी संबंधित अनेक कौशल्ये आत्मसात करणारे श्री. संदीप शिंदे !
स्वाती नक्षत्रातील पावसाने शिंपल्यात होतो मोती ।
संदीप-स्वाती हे दोन मोती विराजू दे श्रीविष्णूच्या मुकुटी । हीच प्रार्थना गुरुचरणी ॥
गौरीगद्दे (शृंगेरी, कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांनी नुकतीच येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन संस्था आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.
श्री. हर्षद आणि सौ. वेदश्री खानविलकर यांना विवाहाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘२३ ते २५.१०.२०१९ या कालावधीत रामनाथी आश्रमात महासुदर्शन याग झाला. त्या वेळी साधक पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्या अनुभूती देत आहोत . . .
‘४.११.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘उग्र प्रत्यंगिरा याग’ झाला. तेव्हा मला देवीचे मुख सिंहरूपात दिसत होते. ‘त्या वेळी देवी माझी पाठ, पाय आणि पोटर्या पहात आहे. देवी त्या भागातील अनिष्ट शक्ती बाहेर काढत आहे’, असे मला जाणवले.
आश्रमातील विवाह सोहळ्यात नऊवारी साडी नेसलेली आणि साज-शृंगार केलेली वधू शोभून दिसत होती. ती ईश्वराच्या अनुसंधानात असल्याचे मला दिसले. नवरदेवाचे रितीनुसार धोतर आणि उपरणे सुशोभित वाटले. या सर्वांमध्ये कुठेच कृत्रिमता नव्हती. तेथे सर्वांमध्ये देवाप्रतीचा उत्कट भाव, भक्ती, नम्रता, लीनता आणि देवाला अपेक्षित असे वागणे दिसून येत होते.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ब्रह्मास्त्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी युरोप येथील साधिका सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.
पूर्वी मी नेहमी स्वतःचाच विचार करायचो; पण आता परात्पर गुरुमाऊलींनीच माझ्यात पालट केले. या पालटांविषयी विचार आल्यावर मला परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात.
हनुमान जयंतीला सायंकाळी संगीत सेवेचा आढावा झाल्यानंतर आम्ही सर्व साधिकांनी एक भावप्रयोग केला. तेव्हा मला भावप्रयोग करत असलेल्या सर्व साधिकांच्या हृदयात परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्मित हास्य करणार्या रूपाचे दर्शन झाले.