सहजावस्थेत राहून साधकांवर प्रीती करणारे पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज !

 पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज म्हणाले, ‘‘माझे महत्त्व काहीच नव्हते. गुरुदेवांनी मला मोठे केले. त्यांनी मला संत केले आणि मला सन्मान दिला. त्यांनीच मला प्रसिद्धी दिली. खरे संत तेच ओळखतात.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचे अवतारांच्या संदर्भात अनमोल मार्गदर्शन !

जगामध्ये पूर्वीपासूनच सत्य आणि असत्य यांची झुंज चालू आहे. खोटा आणि खरा असा वाद चालू आहे. खोटी नीती आणि खरी नीती, असेही चालू आहे; परंतु ईश्‍वर सत्याच्या बाजूला उभा असतो….

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

साधनेतील अडथळे आणि साधनेसाठी मनाचा निश्‍चय हवा यांविषयी पूज्य सखाराम रामजी बांद्रे यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहेत.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी कुटुंबाविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘संसार केल्याने केवळ पोट भरते, पुण्य मिळत नाही. संत आणि देव यांची सेवा केल्याने पुण्य मिळते. बायकोची सेवा केल्याने पुण्य मिळत नाही; परंतु आई-वडिलांची सेवा केल्याने निश्‍चित पुण्य मिळते.

ह.भ.प. सखारामबुवा बांद्रे महाराज यांच्या वहीतील लिखाणाची निवड करतांना सौ. शालिनी मराठे यांना मिळालेली पूर्वसूचना

‘वह्या किती आहेत ? कुणाच्या आहेत ?’, हे ठाऊक नसतांना देवाने दिलेली ही पूर्वसूचनाच होती. नंतर मला कळले की, ते लिखाण रत्नागिरी येथील प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. सखारामबुवा बांद्रे महाराज यांचे आहे.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘इतर प्राण्यांपेक्षा देवाने माणसाला भरपूर सुविधा दिल्या आहेत. इतर प्राणी जेवतांना समवेत पाण्याचा तांब्या कुठे ठेवतात ? माणसाला जेवतांना तोंडी लावायला आणि चवीसाठी भाजी-आमटी मिळते.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘साधूसंत हे चालते बोलते देव असतात; परंतु ते लपून असतात. ते आपला बडेजाव समाजाला दाखवत नाहीत. ते साधे रहातात. ते भगवे किंवा भारी कपडे न वापरता साधी वस्त्रे घालून समाजात वावरतात.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

कुलाचाराने कुळ शुद्ध, पवित्र आणि पुण्यवंत असल्याविना घराण्यात देव, संत आणि अवतार जन्म घेत नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे महाराज संतपदी विराजमान !

धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम बांद्रे महाराज संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.

ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराज यांच्या सन्मानसोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे आणि त्यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार !

‘ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराजांना ईश्‍वराकडूनही प्रतिदिन ज्ञान मिळते, त्यामुळे त्यांची कीर्तने अप्रतिम होतात – (परात्पर गुरु) डॉ. आठवले