पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांची त्यांचे कुटुंबीय, सनातनचे सद्गुरु आणि साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज हे ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालू असते, तेथे पोचतात. हिंदु राष्ट्र जागृती सभांच्या वेळी ते झोकून देऊन सेवा करतात. पूजनीय महाराज मैदानातील कष्टाच्या सेवाही भावपूर्ण करतात.