गुरूंचे माहात्‍म्‍य

‘गुरुभक्‍तीयोगात येते की, सुईच्‍या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण याहूनही अत्‍यंत कठीण गोष्‍ट आहे ‘गुरुकृपेविना ईश्‍वरी कृपा प्राप्‍त करणे.’

…ते लोक स्‍वतःशीच धोका करतात !

ईश्‍वराच्‍या मार्गावर चालणार्‍यांना जे भोगांमध्‍ये पाडतात, संसारात आकर्षित करतात, ते लोक पुष्‍कळ पाप कमवतात. जे लोक भोग वासनेचे संकल्‍प करतात, भोगाच्‍या तृप्‍तीची इच्‍छा करतात आणि ईश्‍वराच्‍या मार्गावर चालणार्‍यांकडून संसाराचा स्‍वार्थ साधू पहातात, ते लोक स्‍वतःशीच धोका करतात.

साधनेचे महत्त्व

आपल्‍या हृदयात धर्म स्‍थापन झाला आहे कि नाही ? धर्म स्‍थापन होईल, तेव्‍हा वैराग्‍य जागृत होईल. धर्माचा रंग जितका गडद (पक्‍का) होईल, तितकीच वैराग्‍याची खुमारी अधिक राहील आणि जितके पापाचरण होईल

शास्‍त्रानुकूल आचरणाचे फळ कोणते ?

‘शास्‍त्रानुसार आचरणाचे धर्म-अनुष्‍ठानाचे फळ हे आहे की, संसारापासून वैराग्‍य येईल. सत्‍संगाचे, शास्‍त्र अध्‍यायनाचे आणि धर्माचे फळ हेच आहे. जर वैराग्‍य येत नसेल, तर तुम्‍ही जीवनात धर्माचरण केले नाही, शास्‍त्रांचा पूर्ण अर्थ समजून घेतला नाही.

सुभाषिते

केवळ दुसर्‍यांचे कल्‍याण करण्‍याच्‍या विचारानेच हृदयात सिंहासमान बळ येते. तुमच्‍यात जी योग्‍यता आहे, तिला ‘बहुजनहिताय’ (सर्वांच्‍या हितासाठी) खर्च करा (वापरा). त्‍यामुळे तुम्‍ही सुयोग्‍य बनाल…..

‘आजची साधना उद्या करणे’, हे काही वेळा अपरिहार्य असते !

‘कधीतरी एखाद्या दिवशी कामाच्‍या घाईगर्दीत साधनेस वेळ मिळाला नाही, उदा. साधनेच्‍या वेळी कुणी अकस्‍मात् आजारी पडला, तर त्‍याला डॉक्‍टरांकडे न्‍यावे लागते. तेव्‍हा ‘आजची साधना उद्या करणे’, हे अपरिहार्य असते.’

ध्‍यान आणि जप एकमेकांचे परिपोषक आहेत !

जपाविना ध्‍यान होत नाही. ध्‍यान ठीक केल्‍याविना जप होणार नाही; म्‍हणून जप करतांना ध्‍यान लावाल, तेव्‍हाच जप ठीक होईल आणि जप ठीक होईल

सुखासाठी बाहेर भटकू नको, आनंद तुझा आत्‍मा आहे !

‘आनंद तुझा आत्‍मा आहे, प्रसन्‍नता तुझा आत्‍मा आहे, गुरुकृपा तुझ्‍या समवेत आहे आणि तरीही तू सुखासाठी बाहेर भटकतो ! कुठपर्यंत ? आपल्‍या खर्‍या घरात ये. शरिराचे घर तर चार भिंतींचे आहे आणि तुझे घर तर हृदयेश्‍वराचे द्वार आहे !’