केरळ येथील सनातनच्या साधिका श्रीमती सौदामिनी कैमल यांचे दु:खद निधन !

श्रीमती सौदामिनी कैमल

केरळ येथील सनातनच्या साधिका श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांचे ६ जुलैच्या रात्री वार्धक्याने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.

श्री. नंदकुमार कैमल

त्यांच्या पश्चात् त्यांचा मुलगा श्री. नंदकुमार कैमल आहेत. श्री. नंदकुमार कैमल केरळ येथे पूर्णवेळ धर्मप्रचाराची सेवा करतात.

श्रीमती सौदामिनी कैमल डोंबिवली येथील शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. सध्या त्या कोची, केरळ येथील सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करत होत्या. सनातन परिवार कैमल यांच्या दुःखात सहभागी आहे.