पुष्‍कळ सोपे आहे र्‍हास थांबवून स्‍वतःचा विकास करणे !

‘व्‍यर्थ चिंतनाचा त्‍याग करावा. व्‍यर्थ चिंतन हटवण्‍यासाठी अधूनमधून ‘ॐ’काराचे उच्‍चारण, स्‍मरण करावे. व्‍यर्थ चिंतनाने शक्‍तीचा र्‍हास होतो, विवंचना होत रहाते. त्‍यात बरीच शक्‍ती खर्च होते. भगवद़्-उच्‍चारण, स्‍मरण याने व्‍यर्थ चिंतनाचा अंत होतो.

त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने अशी आडनावे पालटा !

‘काही जणांची आडनावे ‘गळाकाटू, ढेकणे, म्हैसधुणे, चिकटे, चकणे, चोर, चोरटे, रगतचाटे, चोरमुले, चोरे, बहिरे, दहातोंडे, पायमोडे, डोईफोडे, मानकापे, तांगतोडे’, अशी असतात.

‘आनंद’ हेच प्रसारसेवेतून मिळणारे वेतन !

‘एका साधिकेने सत्‍संगात प्रसार सेवेतील काही अनुभव सांगितले. एका वाचकाच्‍या मुलाने त्‍या साधिकेला विचारले, ‘‘तुम्‍ही जी सेवा करता, त्‍याचे तुम्‍हाला किती वेतन मिळते ?’’ त्‍या साधिकेने सांगितले, ‘‘आम्‍ही आनंदप्राप्‍तीसाठी आणि ‘आमची साधना व्‍हावी’, यासाठी विनामूल्‍य सेवा करतो.’’

साधकांनी अधिकाधिक सेवारत राहिल्‍यास त्‍यांना पुष्‍कळ आनंद मिळेल !

‘काही साधक कार्यक्रमांच्‍या वेळी प्रासंगिक सेवा करतात आणि त्‍यातून त्‍यांना पुष्‍कळ आनंद मिळतो. कधीतरी प्रासंगिक सेवा करून जर एवढा आनंद मिळत असेल, तर पूर्णवेळ सेवा केल्‍यावर किती आनंद मिळेल ! सत्‍सेवेचे एवढे महत्त्व आहे. त्‍यामुळे साधकांनी अधिकाधिक सत्‍सेवा करण्‍याचा प्रयत्न करावा !’

आपल्‍याला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे त्‍वरित लिहून देणे, ही साधकांची समष्‍टी साधना !

‘साधकांनी त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे तत्‍परतेने पुढे लिहून द्यायला हवीत. ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून ही सूत्रे पुष्‍कळ मोठ्या समष्‍टीपर्यंत पोचून सर्वांनाच शिकायला मिळते. यामुळे वाचणार्‍यांना प्रेरणा मिळते आणि साधना अन् सेवा करण्‍याचा त्‍यांचा उत्‍साह वाढतो.

गुरुपादुका !

गुरूंच्‍या चरणांच्‍या ठिकाणी चार पुरुषार्थ म्‍हणजे ४ मुक्‍ती असतात; परंतु ज्‍या ठिकाणी शिव-शक्‍तीचे ऐक्‍य किंवा सामरस्‍य होते, त्‍यालाच श्रेष्‍ठ गुरुपादुका म्‍हणतात.

भक्‍ताबद्दल भगवंताचे विचार !

‘एकदा श्रीराम म्‍हणाला, ‘मी आपला अपमान तर सहन करून घेतो; परंतु माझ्‍या भक्‍ताचा अपमान माझ्‍याकडून सहन होत नाही. माझा कुणी सन्‍मान केला, तर मला तितका आनंद होत नाही, जितका माझ्‍या भक्‍ताच्‍या सन्‍मानाने मला आनंद होतो.’

उत्तरदायी साधकांनी भाव असलेल्‍या साधकांच्‍या भावजागृतीच्‍या प्रयत्नांचा आढावा तारतम्‍याने घ्‍यावा !

ज्‍या साधकांची भावजागृती होत नाही, त्‍यांना चिंतन सारणीनुसार प्रयत्न करण्‍याची दिशा द्यावी !’