ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की, तिच्यामागे असणार्या सहस्रो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात. त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की, आपल्या मनात उठणारे सहस्रो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते, त्यालाच ‘आत्मज्ञान’ म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय !
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’ फेसबुकवरून साभार)