चिंतनाचे महत्त्व !
‘अध्यात्म-ज्ञान-प्राप्तीचे रहस्य ज्यात साठवले आहे, त्याला ‘चिंतन’ असे नाव आहे. शास्त्र भौतिक असो वा आध्यात्मिक असो, त्याचा खरा अभ्यास चिंतनातूनच होतो. त्यात अध्यात्मशास्त्र, तर चिंतनाशिवाय समजणे शक्यच नाही, अशी परिस्थिती आहे. चिंतन, म्हणजे एखाद्या विषयावरील मूलभूत विचार !