एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने रहातो. ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे नि:संशय असते, त्याला दगडाची मूर्तीसुद्धा देव बनते; पण भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो, तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. उपासक देहाला विसरला की, उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (साभार : ‘पू. के.वि. बेलसरे – आध्यात्मिक साहित्य’फेसबुक)