सेवेच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘अभिनेता जेव्हा त्याच्या भूमिकेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याचा अभिनय जिवंत वाटतो. याप्रमाणे साधक जेव्हा मनाने सेवेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याची सेवा परिपूर्ण होते.

कृतज्ञताभाव दर्शवणारी पौराणिक काळातील उदाहरणे !

शिवाने प्रसन्न होऊन चंद्रदेवाला शापमुक्त केले. तेव्हा चंद्रदेवाने शिवाच्या चरणी कृतज्ञताभावाने कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा निस्सीम कृतज्ञताभाव पाहून शिवाने चंद्राला पूर्णपणे शापमुक्त करण्यासाठी त्याला स्वत:च्या मस्तकावर धारण केले.

गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक

गुरु स्वत:च शिष्याला प्रश्न विचारुन योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खर्‍या रस्त्याकडे वळवतात !

गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक

गुरूंविषयी आपली खात्री जितकी दृढ तितकी प्रचीती खात्रीपूर्वक मिळते ! – प.पू. भक्तराज महाराज   

पू. संदीप आळशी यांची साधनेसंदर्भातील मौलिक सूत्रे

साधना म्हणून मनाविरुद्ध काही गोष्टी करतांना मनाचा संघर्ष होतो. हा संघर्ष म्हणजेच खरी साधना !