सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे
‘भगवंत (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सेवा उपलब्ध करून देतो. माझ्याकडून सेवा करवूनही घेतो; परंतु सेवा झाल्यावर कर्तेपणाच्या विचारांमुळे ‘ती सेवा मी केली’, असे साधकाला वाटते. कर्तेपणा नष्ट करण्यासाठी प्रत्येक सेवेची संधी दिल्याविषयी, सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ‘ती देवानेच करवून घेतली आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होऊन त्या सेवेतून आपली साधना होईल.’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)