पुणे शहर भाजपची कार्यकारिणी घोषित !

भाजप

पुणे – भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांच्या निवडीनंतर एका मासाने पुणे शहराची कार्यकारिणी १९ सप्टेंबर या दिवशी घोषित करण्यात आली. सरचिटणीसपदी चौघांची नियुक्ती करणार असे असतांना सरचिटणीसपदी ८ जणांना निवडण्यात आलेले आहे. उपाध्यक्ष आणि चिटणीसपदी प्रत्येकी १८ जणांची निवड करण्यात आलेली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यावर भर दिल्याचे दिसून आले.