९ मासांपूर्वी बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचे उघड !
पिंपरी (जिल्हा पुणे) – बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून देशात अवैधपणे वास्तव्य करणार्या ३ बांगलादेशींना राज्य आतंकवादविरोधी पथकाच्या पुणे विभागाने मोशीतील बोर्हाडेवाडी येथून १८ सप्टेंबरला अटक केली. त्यांच्याकडून बांगलादेशी चलन, भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त केले आहे. सुकांथा बागची, नयन बागची आणि सम्राट बाला अशी त्यांची नावे आहेत. तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तक्रार दिली आहे. तिघेही घुसखोरी करून भारतात आले होते. येथे ते मजूर म्हणून काम करत होते. त्यांनी कोलकाता येथून ९ मासांपूर्वी बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवले होते.
संपादकीय भूमिकाबांगलादेशींचे हक्काचे स्थान झालेला भारत ! बांगलादेशींची घुसखोरी, म्हणजे आपल्याच भ्रष्ट व्यवस्थेचे धिंडवडे आहेत, हे लक्षात घ्या ! या घुसखोरांना आधारकार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे उपलब्ध करून देऊन सहस्रो देशद्रोही गुन्हेगार निर्माण करणार्यांना आजपर्यंत कुठली कठोर शिक्षा झाली ? |