तळेगाव ढमढेरे (पुणे) येथे जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या ट्रकवर कारवाई !

तळेगाव ढमढेरे (जिल्‍हा पुणे) – शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावर दाटीवाटीने जनावरे कोंबून वाहतूक करणार्‍या ट्रकवर शिक्रापूर पोलिसांनी १६ सप्‍टेंबर या दिवशी कारवाई केली आहे. ट्रकमध्‍ये १२ म्‍हशी, १० पारडे यांना दाटीवाटीने कोंबून भरण्‍यात आले होते. या प्रकरणी ट्रकचालक संदीपकुमार जांगडा यांच्‍यावर गुन्‍हा नोंद केला आहे, तसेच ट्रक जप्‍त करून ही जनावरे हडपसर येथील गोशाळेत नेली आहेत. जनावरांची वाहतूक होत असल्‍याची माहिती ऋषिकेश कामठे, संतोष गुंजाळ, दिनेश कुंजीर आणि आकाश शिंदे यांना मिळाली होती. त्‍यांनी शिक्रापूर पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणी पोलीस शिपाई अविनाश पठारे यांनी तक्रार प्रविष्‍ट केली आहे. (अशी माहिती  पोलिसांव्‍यतिरिक्‍त अन्‍यांना कशी काय मिळते ? याचा पोलीस कधी विचार करणार ? – संपादक)