पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात भरती

वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १३ मार्चच्या रात्री त्यांना अटक केली. वाझे २५ मार्चपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत आहेत.

देहली, केरळ आणि कर्नाटक येथील धाडीतून इस्लामिक स्टेटशी संबंधित ५ जिहाद्यांना अटक

अशांना कारागृहात ठेवून पोसण्यापेक्षा जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

अन्वेषणाची दिशा आणि दशा !

मुंबईत स्फोटके सापडणे आणि यामध्ये एकाचा संशयास्पद मृत्यू होणे, या प्रकरणी खरेतर महत्त्वाच्या अन्वेषण यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून गतीने अन्वेषण पूर्ण करणे अपेक्षित होते; मात्र घडले उलटेच.

देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’ने सखोल अन्वेषण करावे !

देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल अन्वेषण करण्यात यावे, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राज्यभर निवेदन देण्यात आले.

असुरक्षित मुंबई !

काही दिवसांपूर्वी मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. त्याविषयी मुंबई, महाराष्ट्रातील सुरक्षायंत्रणांसह राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अन्वेषण करीत आहेत.

शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना ६ मासांचा अंतरिम जामीन

नक्षलवादी चळवळीला प्रोत्साहन देणे, हिंसक कारवायांनी सध्याचे शासन उलथवून लावण्याचा कट कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करणे आदी गंभीर आरोप असलेले वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने ६ मासांचा सशर्त जामीन संमत केला आहे.

न्यायालयीन चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार

२६ जानेवारीच्या दिवशी देहलीत ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे अन्वेषण सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने करावे, अशी मागणी करणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

सुलेमानी सूड !

काँग्रेसच्या काळाच्या तुलनेत या सरकारच्या काळात घातपाती कारवायांवर लगाम लावण्यात आला आहे, हे नाकारता येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर आताच्या झालेल्या स्फोटाकडे सरकार गांभीर्याने लक्ष देईल आणि ते करणार्‍यांची पाळेमुळे खणून काढील, हीच अपेक्षा !

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित राहून मी माझे कर्तव्य बजावत होतो ! – ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित

‘कर्तव्य म्हणून बैठकीला उपस्थित राहिल्यानंतरही मला कारागृहात टाकले गेले आणि आतंकवादी असल्याचा ठपका ठेवून छळवणूक करण्यात आली’ – ले. कर्नल पुरोहित

केरळमध्ये आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी पीएफ्आयने पैसे गोळा केले ! – ईडीचा आरोप

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात अनेक पुरावे सापडूनही केंद्र सरकार अद्याप तिच्यावर बंदी घालत नाही, हे आश्‍चर्यच म्हणावे लागेल, असाच विचार हिंदूंच्या मनात येत असणार !