पुणे ‘बंद’ला विरोध करणार्‍या महिलेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तक्रार !

घैसास यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केली; म्हणून राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी घैसास यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !

महाराष्ट्रातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकेची धमकी !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पवनाथाडी यात्रेसाठी येणार असल्याने त्यांना पुन्हा एकदा शाईफेकेची धमकी दिली आहे. ‘पत्रकार मित्रांनो, आज पण चांगला अँगल घ्या, चंपाचे तोंड काळे करा रे’, अशी धमकीवजा चेतावणी त्यांना दिली आहे.

शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेण्याची पात्रता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबियांची नाही ! – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

शरद पवार यांनी ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगले, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि अर्थमंत्री होत आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते. त्यांचाच नातू परत आमदार होतो.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरण भारताच्या कायदेतज्ञांकडे पाठवले आहे ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हे प्रकरण केंद्रीय कायदेतंत्रांचा सल्ला घेण्यासाठी पाठवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

नक्षलवाद्यांच्या धमकीच्या वेळी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याच्या धारिकेवर उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली नाही ! – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्कमंत्री

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आत्राम यांना सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी केली. त्यावर शंभूराज देसाई ही माहिती दिली.

आमदार सौ. सरोज अहिरे-वाघ स्वतःच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला उपस्थित !

बाळ माझ्याविना राहू शकत नाही; मात्र माझे कुटुंबीय माझ्यासमवेत आले असून ते बाळाची काळजी घेतील, तेव्हा मी मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडणार आहे; कारण हे प्रश्नही महत्त्वाचे असल्याने मला बाळाला घेऊन यावे लागले.

महाविकास आघाडीकडून मोर्च्याद्वारे शक्तीप्रदर्शन

महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, तसेच बेरोजगारी आदी विविध प्रश्नांविषयी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात आला.

नवाब मलिक यांच्या जामिनासाठी तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या जामिनावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ६ जानेवारी २०२३ या दिवशी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होणार आहे.

दिघा (नवी मुंबई) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा नोंद

दिघा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन गवते यांच्यासह पाच जणांवर फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.