ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयी जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आमदार छगन भुजबळ यांनी ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयीचे सूत्र लक्षवेधी सूचनेच्या वेळी सभागृहात उपस्थित केले होते. 

लोकशाहीमध्ये कारवाईत विरोधाभास का ?

जे जे चुकीचे आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे. योगायोगाने ‘निर्लज्ज’ आणि ‘बेशरम’ या शब्दांचा अर्थ समान आहे; पण व्यक्तीपरत्वे कारवाईत मोठा विरोधाभास आहे !

वीर सावरकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांची १०० कोटींची मागणी !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर येथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.

राहुरीच्या (नगर) पोलीस निरीक्षकाच्या समर्थनार्थ नागरिकांचे चक्काजाम आंदोलन !

धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्‍या आरोपीला राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पाठीशी घातल्याचा आरोप ! यानंतर प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी दराडे यांच्या तडकाफडकी स्थानांतराचे आदेश दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन !

विधानसभेच्या अध्यक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित रहाता येणार नाही.

आदिवासी समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार ! – सुरेश खाडे, कामगारमंत्री

आदिवासी-कातकरी समाजातील वेठबिगारीचा प्रश्न आणि त्यात मुलीचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. याविषयी गुन्हे नोंद करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

अधिष्ठाता आणि संबंधित आधुनिक वैद्य यांची विभागीय चौकशी करणार ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मुंबई, पुणे, संभाजीनगर अशा मोठ्या शहरांतील सर्व शासकीय रुग्णालयांत येणार्‍या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे सर्व रुग्णांना व्हेंटिलेटर देणे अशक्य असते. तरीही ते देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

तारांकित प्रश्‍नातील मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांशी संबंधित भाग परस्पर वगळल्याने विरोधक अप्रसन्न !

राज्यातील ‘टीईटी’ परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्‍नातील सत्तारूढ पक्षातील मंत्री आणि आमदार यांच्याशी संबंधित २ भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अप्रसन्नता !

पुणे ‘बंद’ला विरोध करणार्‍या महिलेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तक्रार !

घैसास यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केली; म्हणून राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी घैसास यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !

महाराष्ट्रातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर !