पुणे ‘बंद’ला विरोध करणार्‍या महिलेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तक्रार !

अनघा घैसास

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाजपचे नेते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवप्रेमी संघटना, राजकीय पक्षांकडून ‘पुणे बंद’ची हाक देण्यात आली होती. तेव्हा डेक्कन परिसरातील साड्यांच्या दुकानाच्या अनघा घैसास यांनी ‘बंद’ला विरोध केल्याची चलचित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध झाली आहे. घैसास यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केली; म्हणून राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी घैसास यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

याविषयी घैसास त्यांच्या ‘फेसबुक’ पोस्टद्वारे म्हणाल्या की, तुम्ही राजकीय शक्ती वापरून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहात. हा मुळात अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. माझी ‘केतकी चितळे’ करण्याचा बेत आहे का ?