राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन

प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता; मात्र नंतर त्यांचा अहवाल नकारात्मक आला होता.

महिला दिवसातून सरासरी ६२ वेळा, तर पुरुष केवळ ८ वेळाच हसतात ! – सर्वेक्षण

हसण्यामुळे रक्तदाबाचा त्रास न्यून होतो. जेव्हा व्यक्ती हसते, तेव्हा २२ स्नायू काम करतात. त्यामुळे हसण्याने शरिराची ऊर्जाही वाचते.

कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आयुष ६४ हे औषध प्रभावकारी !

कोरोनाग्रस्तांवर केंद्र सरकारने निश्‍चित केलेल्या उपचारपद्धतीमध्ये आयुर्वेदिक आयुष ६४ या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक ठरले आहे, असे निष्कर्ष या संशोधनातून समोर आले आहेत.

वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरातील विशाल अक्षयवट वृक्ष प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पडला !

हिंदूंच्या आध्यात्मिक ठेव्याची अशा प्रकारे हेळसांड करणार्‍या संंबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

लोक मरत रहावेत, अशीच तुमची इच्छा असल्याचे दिसते !

रेमडेसिविरवरून देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले !

हिंदूंच्या प्रसिद्ध देवस्थानांचा कोरोना रोखण्यासाठी रुग्णालये, विविध सेवा, औषधे आदी माध्यमांतून सक्रीय सहभाग

एकीकडे हिंदूंची मंदिरे कोरोनाबाधितांना सर्वतोपरी साहाय्य करत आहेत, तर दुसरीकडे ‘कोरोनाच्या परिस्थितीचा अपलाभ उठवत काही चर्च हिंदूंचे धर्मांतर करण्यात मग्न आहेत’, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे !

कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी विवाह रोखणार्या जिल्हाधिकार्यांची क्षमायाचना

राज्यातील पश्चिम त्रिपुरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेशकुमार यादव यांनी विवाहस्थळी जाऊन विवाह थांबवला. त्यामुळे झालेल्या टीकेनंतर त्यांनी क्षमा मागितली आहे. यादव यांनी म्हटले आहे, ‘माझा हेतू कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता.’

पोलिसांनी रात्रभर ऑक्सिजनची गाडी रोखून धरल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा

पोलीस अधीक्षकांचा चौकशीचा आदेश !

पंचतारांकित हॉटेलमध्ये न्यायाधिशांसाठी कोविड सेंटर उभारण्याची मागणी करण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही ! – देहली उच्च न्यायालयाचा खुलासा

आम्ही स्वतःसाठी, कर्मचार्यांसाठी किंवा आमच्या कुटुंबियांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये कोविड सेंटर उभारण्याचा सल्ला दिला नव्हता, असा खुलासा देहली उच्च न्यायालयाने केला आहे.

कोणताही क्यू.आर्. कोड किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यू.आर्. कोड स्कॅन करू नका !

कोणताही क्यू.आर्. कोड किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यू.आर्. कोड स्कॅन करू नका, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी केले आहे. जर चुकूनही कोड स्कॅन केला, तर बँक खात्यामधील पैसे जाऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे.