नवी देहली – आम्ही स्वतःसाठी, कर्मचार्यांसाठी किंवा आमच्या कुटुंबियांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये कोविड सेंटर उभारण्याचा सल्ला दिला नव्हता, असा खुलासा देहली उच्च न्यायालयाने केला आहे. देहलीतील अशोका हॉटेलमध्ये देहली उच्च न्यायालयाच्या सल्ल्यामुळे १०० खोल्या न्यायाधिशांसाठी आरक्षित करून कोविड सेंटर बनवण्याच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून उच्च न्यायालयाने खुलासा केला. न्यायालयाने म्हटले की, याविषयी कुणाशीही चर्चा झाली नव्हती. आम्ही असा कोणताही आग्रह केला नव्हता. एखाद्या संस्थानिकांप्रमाणे सुविधा मिळावी, असा आम्ही विचारच करू शकत नाही.