मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न !

मुंबई – येथे पावसाळी अधिवेशनाच्या ठिकाणी मंत्रालयाच्या छतावर मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता युवराज चौहान चढले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात सूत्र उपस्थित केले असता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित घटनेचे दायित्व सभागृहाकडे येत नाही, तरी कार्यकर्त्याच्या मागणीविषयी चर्चा करू, असे आश्वासन दिले.

संपादकीय भूमिका 

समस्या सोडवण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबणे सर्वथा चुकीचे आहे. समाजाला धर्मशिक्षण न दिल्याने अमूल्य असा जीव घालवणे किती चुकीचे आहे, हे समाजाला समजत नाही.