अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या परिसरात अवैध धंदे चालणार्‍या चित्रपटगृहाचा परवाना रहित ! – गृहमंत्री

देवेंद्र फडणवीस

मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या शांभवी लॉजिंग आणि बालाजी चित्रपटगृह येथे अवैध धंदे चालू आहेत, अशी माहिती भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी २५ ऑगस्ट या दिवशी लक्षवेधीद्वारे विधानसभेत उपस्थित केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवैध धंदे चालणारे चित्रपटगृह आणि ऑर्केस्ट्रा यांचा परवाना रहित करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली. येथील चित्रपटगृह आणि ऑर्केस्ट्रा येथे अवैध धंदे चालत असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. याविषयी महावितरण आस्थापनाला वीजजोडणी तोडण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्यानंतरही महावितरणकडून कारवाई करण्यात येत नसल्याची माहिती सचिन कल्याणशेट्टी यांनी सभागृहात दिली. यावर गृहमंत्री फडणवीस यांनी येथील अवैध धंदे रोखण्यासाठी कडक निर्देश देण्याचे आश्वासन दिले.

संपादकीय भूमिका

सर्वच तीर्थक्षेत्रांच्या परिसरातील असे अपप्रकार दूर करावेत, ही हिंदूंची अपेक्षा !