विधीमंडळाच्या आवारात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी !

शिवेंद्रसिंह भोसले

मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आपल्या सर्वांचे रक्त सळसळते. आपल्या सर्वांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होते. हे लक्षात घेऊन विधीमंडळाच्या आवारात मेघडंबरी असल्याचा भव्य पुतळा उभारावा, अशी मागणी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली. पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी केली. अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी ‘समिती गठित करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना कशी असेल, हे निश्चित करण्यात येईल’, असे सांगितले.