गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांच्या वाहनांना पथकरामधून सूट !

पथकरामधून सूट मिळण्यासाठी नागरिकांनी वाहनांची कागदपत्रे स्थानिक प्रादेशिक परिवहन विभाग (आर्.टी.ओ.) यांच्या कार्यालयात जमा करावी.

पोलिसाच्या पत्नीवर अत्याचार करणारा हवालदार निलंबित !

पोलीस कर्मचार्‍याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलीस हवालदारावर विनयभंगाचा गुन्हा नोंद करून त्याला निलंबित करण्यात आले आहे. सचिन सणस असे हवालदाराचे नाव आहे. सणस याला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती !

शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केली असून यापुढील निवडणुका संभाजी ब्रिगेडसमवेत एकत्रित लढवण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

शासकीय कामानिमित्त दूरभाष करतांना ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याविषयी वन विभागाकडून शासन आदेश निर्गमित !

दूरभाष किंवा भ्रमणभाष यांद्वारे संभाषण करतांना अभिवादन करतांना वन विभागाचे सर्व अधिकारी अन् कर्मचारी यांनी ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ या शब्दाचा वापर करावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करण्यावर प्रतिबंध आणण्याच्या प्रश्नावरून विधान परिषदेत गदारोळ !

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ‘या विषयावर आचारसंहितेसंबंधी बैठक घेण्यात येईल’, असे सांगितले. यानंतर सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी विधीमंडळ सचिवालयाचे परिपत्रक वाचून दाखवले.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘एक दिवस बळीराजासोबत’ मोहीम !

सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ या ३ मासांत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महसूल विभाग, कृषी,  ग्रामविकास हे विभाग या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

मुंबई महापालिकेचे महालेखा परीक्षकांकडून विशेष ऑडीट करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

महापालिकेतील घोटाळ्यांच्या काही आरोपांची नगरविकास विभागाच्या अधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात येईल. चौकशीचा फार्स न करता आरोपांची चौकशी कालबद्धतेने पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याची सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा !

जिल्हा नियोजन निधीतून ३ वर्षांत यासाठी १ सहस्र कोटी रुपये उपलब्ध होतील, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली.

बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे कंत्राट घेतले आहे !

महाराष्ट्राचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. उत्तम विरोधक बनून सहकार्य करावे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी ही राज्याची २ चाके आहेत. राज्याच्या हितासाठी दोघांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.

रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी रुग्णालय सल्लागार समिती गठीत करणार ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईतील रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना बसण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता यांविषयीच्या समस्या  सोडवण्यासाठी सल्लागार समिती कार्य करेल.”