लोकलच्या प्रवासात युवतीने ‘टिकली’चे महत्त्व अधोरेखित करून दिला संदेश !

महिलांसाठी धर्माविषयीचा महत्त्वाचा संदेश पत्रकाद्वारे देणारी युवती

मुंबई – ‘टिकली’वर ‘श्रद्धा’ असती तर ‘श्रद्धा’ आज ‘टिकली’ असती….!, अशा आशयाचे मार्मिक पत्रक हाती घेतलेल्या एका युवतीने लोकलगाडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नुकतेच चर्चिले जात असलेले श्रद्धा वालकर प्रकरण पहाता ‘सगळे अब्दुल हे सारख्याच मनोवृत्तीचे असतात. अशा जिहाद्यांना बॉयकॉट करा’, असा संदेश तिने लोकल प्रवासात दिला. तिच्या या धाडसाचे सामाजिक माध्यमांवर कौतुक झाले आहे.