हिंदु धर्मप्रेमींकडून कार्यक्रमाचा निषेध !
मुंबई – श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सौभाग्याचे प्रतीक म्हणून टिकली लावणे हा वेडसरपणा असल्याचे हिंदुद्वेषी वक्तव्य झी मराठी वाहिनीवर ‘फू बाई फू’ विनोदी कार्यक्रमात करण्यात आले. ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाविषयी हिंदूंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
‘टिकली’ वादात झी मराठीला केलं प्रेक्षकांनी ट्रोल; फू बाई फूमधील या प्रहसनावर प्रेक्षकांचा संताप https://t.co/B8FlqNyTQ7
— Maharashtra Times (@mataonline) November 20, 2022
व्हिडिओतील आक्षेपार्ह संवाद
‘मी म्हणजे बाई ना ! टिकली लावायची कि नाही लावायची, हे बाईला ठरवू द्या. दुसरे तुम्ही काय बोललात, अगदी वेड्यासारखे की, ‘टिकली म्हणजे नवरा जिवंत असल्याचे प्रतीक !’ मग मी आरशाला टिकली लावून आंघोळीला जाते, तेवढ्या वेळात तुम्ही आरशाला येऊन चिकटता का ? इतकेच काय शृंगार (‘मेकअप’) करतांना मी कितीवेळ विना टिकलीची असते. तेवढ्या वेळात तुम्ही कोमात जाता कि काय ? अहो, असे काय करता ? आपले हे नाते प्रेमावर टिकले आहे. टिकलीवर नाही’, असा संवाद कार्यक्रमात अभिनेत्रीच्या तोंडी दिलेला आहे.
‘मग हिजाबही बाईलाच ठरवू द्या’, असा व्हिडिओ बनवा ! – सामाजिक संकेतस्थळांवरील नागरिकांची प्रतिक्रिया
‘संस्कृती ही संस्कारातून घडलेली कृती आहे. हिंदु धर्मातील संस्कार काय, हे त्यांना कसे कळणार ? दीडदमडीसाठी स्वतःच्या धर्मावर प्रश्न उभे करणारे जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत, याचा प्रत्यय यांना येईलच. राहीला हिंदु धर्माचा प्रश्न, तर तो मृत्यूंजय आहे. अनंत आहे. तुम्ही आम्ही नसू, हिंदु धर्म संस्कृती कायम असेल’, अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली आहे. ‘मग हिजाबही बाईलाच ठरवू द्या’, असाही व्हिडिओ बनवा’, अशी प्रतिक्रिया अन्य एकाने दिली आहे. अशा प्रकारे बहुतांश ‘नेट’कर्यांनी या कार्यक्रमाविषयी संताप व्यक्त केला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्मशास्त्राला वेडसरपणा ठरवणार्या ‘झी मराठी’ वाहिनीने समस्त हिंदूंची क्षमा मागावी. असे न केल्यास हिंदूंनी अशा वाहिन्यांवर बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |