‘कॅग’कडून मुंबई महापालिकेतील व्यवहारांची चौकशी !

मुंबई – ‘कॅग’कडून (‘कम्प्ट्रोलर अँड ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’) महापालिकेतील १२ सहस्र कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या चौकशीला प्रारंभ करण्यात आला आहे. कॅगचे १० अधिकारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आले असून त्यांनी विविध विभागांच्या व्यवहारांची कागदपत्रे कह्यात घेतली आहेत.

कोरोना महामारीच्या काळात झालेल्या कामांच्या वाटपाची ‘कॅग’च्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. या काळात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता कंत्राटे देऊन वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या १० खात्यांतून झालेले व्यवहार कॅगच्या रडारवर असणार आहे.