मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यावर गुन्हा नोंद !

मुंबई – मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापुढे आत्महत्येचा प्रयत्न करणारे अशोक चौरे (वय ५० वर्षे) यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी नोटीस देऊन त्यांना सोडले आहे. चौरे हे बाणेर (पुणे) येथील रहाणारे आहेत. त्यांचा भाऊ काशिनाथ चौरे यांची हत्या झाली. या प्रकरणी अशोक चौरे यांनी संशयितांची नावे सांगूनही अद्याप कुणाला अटक करण्यात न आल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.