भोईवाडा (मुंबई) येथे १२ ते १८ एप्रिल कालावधीत अखंड नामजप, यज्ञ सप्ताह !

मुंबई – श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) यांच्या भोईवाडा (शिवडी) येथील केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी प्रित्यर्थ १२ ते १८ एप्रिल  या कालावधीत अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. परळ येथील भोईवाडा ट्रांझिट कॅम्पच्या मागे टी. एस. कंपाउंड येथे हा सोहळा होणार आहे.

या कालावधीत यज्ञयाग, तसेच अन्य सामुदायिक सेवा यांमध्ये भाविकांना सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घेता येणार आहे. या ठिकाणी भाविकांना नियमित महाप्रसादाचाही लाभ घेता येणार आहे. या सोहळ्याला अधिकाधिक भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

पालखी सोहळ्यामध्ये स्वरक्षण प्रात्यक्षिकांचे सादरीकीकरण !

पालखी सोहळ्यात दाखवण्यात आलेली प्रात्यक्षिके

९ एप्रिल या दिवशी भोईवाडा येथील श्रीराम मंदिराच्या येथून ते सहकारनगरपर्यंत श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे या पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भगवे ध्वज घेऊन पारंपरिक वेशभूषेत भाविक या पालखी सोहण्यात सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीद्वारे स्वरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या प्रात्यक्षिकांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.