स्वातंत्र्यवीरांचा जन्मदिन महाराष्ट्रात ‘स्वातंत्र्यवीर गौरवदिन’ म्हणून साजरा होणार !

डावीकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि एकनाथ शिंदे

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस महाराष्ट्र शासन ‘स्वातंत्र्यवीर गौरवदिन’ म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.


देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रोउन्नती यांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान मोठे आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचार यांना पुढे नेण्यासाठी आणि त्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरवदिन’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती, असे एकनाथ शिंदे यांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे.