माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिंदुजा रुग्णालयात भरती !

२२ मेच्या रात्री प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

पंढरपूर मंदिर आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र यांच्या विकास आराखड्याला शासनाकडून मान्यता !

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंढरपूर मंदिर विकास आराखड्याचे या वेळी सादरीकरण केले. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे.

आपल्यासह कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी !

विविध भ्रमणभाष क्रमांकावरून वानखेडे आणि त्यांची पत्नी यांना धमक्या येत असून त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल घोषित !

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष २०२२ च्या परीक्षेचा निकाल २३ मे या दिवशी आयोगाकडून घोषित करण्यात आला.

मुंबईत प्रतिदिन हृदयविकारामुळे २६, तर कर्करोगामुळे २५ जणांचा मृत्यू !

वाढते मृत्यू टाळण्यासाठी आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार करा !

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यात नवीन महामंडळाची स्थापना !

रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज आदी २२ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यशासनाने ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची (एम्.एस्.आय्.डी.सी.) स्थापना केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे हे महामंडळ संचलित केले जाईल.

#Exclusive : सावरकरांनी सांगितल्यानुसार हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा विसरून एकत्र आल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

सावरकरांनी हिंदूंना एक संदेश दिला होता की, जर हिंदुस्थानला पुन्हा समर्थ आणि संपन्न बनवायचे असेल, तसेच सगळ्या अडचणींवर मात करायची असेल, तर हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा हे सगळे विसरून एकत्र आले पाहिजे.

११ वर्षांनंतरही दंगलीच्या हानीभरपाईची वसूली नाही !

ही दंगल ज्या सरकारच्या काळात झाली, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबंधितांनाही तत्परतेने कार्यवाही न केल्याप्रकरणी आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा मिळायला हवी !

मुंबई पोलिसांना अज्ञाताकडून धमकी !

मुंबई पोलिसांना एका व्यक्तीने २१ मे च्या रात्री दूरभाष करून धमकी दिली. त्याने बोलण्यात २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा उल्लेख करत दूरभाष अचानक बंद केला.

भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक व्हावे ! – रमेश बैस, राज्यपाल

२१ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे राज्यपालांच्या हस्ते मेजर कौस्तुभ राणे यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देऊन मरणोत्तर सन्मान करण्यात आला.