‘पर्यावरणपूरक’ असा खोटा प्रचार करून प्रदूषणकारी कागदी लगद्यांच्या गणेशमूर्तींची केली जाते विक्री !

कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींवर बंदी असतांनाही त्याची उघडपणे राज्यात विक्री होते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

कुख्यात अमली पदार्थ तस्कर अली शिराझी याला अटक

अमली पदार्थांचे जाळे नष्ट न करता येणे पोलीस-प्रशासन यांचा लज्जास्पद ! असे पोलीस-प्रशासन समाजहित काय साधणार ?

कलियुगात वाईट लोकांच्या पापांचा घडा भरेल, तेव्हा महादेवाला पृथ्वीवर यावे लागेल ! – क्रांती वानखेडे

माझी आजी म्हणायची हे कलियुग आहे. जे लोक खरे काम करतात, त्यांना दाबणार्‍यांची संख्या अधिक आहे; पण चांगले आणि खरे काम करणार्‍या लोकांना दबाव टाकून त्यांना त्रास देऊन त्यांना जेव्हा तोडले जाईल, तेव्हा पापाचा घडा भरेल.

हिंदू काँग्रेसला मते देतात यापेक्षा दुर्दैव ते काय ? – अभिनेते शरद पोंक्षे

हे आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. शपथ ग्रहणाच्या अगोदर जाऊन टिपू सुलतानच्या थडग्यावर दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आले आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले. काँग्रेस पक्ष उघडपणे इतके सगळे करत असतांनाही जेव्हा हिंदू लोक यांना मते देतात, त्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते ?

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी !

आशिष देशमुख यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयीचा आदेश दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकोषांवर गुन्हा नोंदवा ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बोगस बियाण्यांचे वाटप केले जाते. खते आणि बियाणे देण्यासाठी आणि अन्य उत्पादने घेण्यासाठी शेतकर्‍यांवर दबाव आणला जातो. अशांवर कडक कारवाई करण्यात यावी.’’

धर्मांधाने मुंबईतून आझमगड येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेले !

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे यावर काही बोलतील का ?

देशात राबवले जाणार महाराष्ट्रातील सौर कृषी योजनेचे ‘मॉडेल’ !

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ऊर्जा विभागाने सौर ऊर्जेवरील वीज जोडण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. मार्च २०२२ पर्यंतच्या नोंदणीला जोडणी देण्यात आली आहे.”

शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे ! – मुख्यमंत्री

शेतकर्‍यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.