चकमक तज्ञ दया नायक पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत रुजू !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकात कार्यरत असणारे पोलीस अधिकारी दया नायक यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत घेण्यात आले आहे. चकमक तज्ञ (‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’) म्हणून ओळख असणारे नायक यांनी स्वतःच ट्वीट करून ही माहिती दिली.

समीर वानखेडे यांची ५ घंटे चौकशी !

आर्यन खान याच्या अटकेच्या प्रकरणात २५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सलग दुसर्‍या दिवशी तत्कालीन अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एन्.सी.बी.चे) आणि आय.आर्.एस्. अधिकारी समीर वानखेडे यांची ५ घंटे चौकशी केली.

वाशी येथे ‘जयोस्तुते’ कार्यक्रमाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना गीतरूपी मानवंदना देणारा ‘जयोस्तुते’ हा कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. २३ मेच्या रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

गेल्या ४ मासांत मुंबईत सर्वाधिक म्हणजे ३२५ बलात्कारांच्या घटनांची नोंद !

समाजाची नैतिकता ढासळल्याच्या आणि समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता अनिवार्य असल्याचे लक्षात आणून देणार्‍या घटना !

बंगालमध्ये चित्रपटगृहांच्या मालकांना चित्रपट न दाखवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांच्या धमक्या !

बंगालमधील हिंदुद्वेषी आणि धर्मांध मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही ! अशा पक्षाला निवडून देणार्‍या बंगालमधील हिंदूंना पुढे धर्मांधांकडून मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, तर आश्‍चर्य वाटू नये !

जानेवारी ते मार्च या काळात मुंबईमधून ३८३ मुली बेपत्ता !

मुंबईला सुरक्षित मानणारे, तसेच ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणारे या घटनेविषयी काही बोलतील का ? मुंबईसारख्या उच्चभ्रू शहरातूनही मुली गायब होतात, याचा अर्थ यामागील कारणांचा गांभीर्याने शोध घेऊन कारवाई करायला हवी !

मुंबईमध्ये घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्याच !

शाडूची माती ही नैसर्गिक असल्यामुळे त्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही. याउलट कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे प्रदूषण होते. त्यामुळे शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहेत.

अजूनही हिंदू एक होत नाहीत ! – शरद पोंक्षे यांची खंत

हिंदू अजून एक होत नाहीत. जागे होत नाहीत, यासारखे दुःख नाही. ऐकूया सावरकर, वाचूया सावरकर. आपण सगळ्यांनी एक होऊया. हिंदु धर्मातील सर्व जाती संपवून ‘हिंदु’ ही एकमेव जात निर्माण करूया. हेच या माणसाने स्वप्न पाहिले. ते आपण पूर्ण करूया.

अनधिकृत बांधकामे रोखण्‍यासाठी १० ते २५ सहस्र रुपये अनामत रक्‍कम भरण्‍याचे आदेश !

मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या पाचही बाजारपेठांतील व्‍यापार्‍यांनी गाळा दुरुस्‍तीच्‍या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केले आहे.

धुळे-मनमाड-दादर एक्‍सप्रेसला आणखी ४ डबे जोडणार !

दैनंदिन चाकरमानी, व्‍यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी यांच्‍या मागण्‍या लक्षात घेऊन आता या गाडीस आणखी ४ नवीन डबे जोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.