मुख्यमंत्री येणार म्हणून शेकडो कर्मचार्‍यांना कामाला लावून वर्षभर कचरा साचलेले रस्ते पाण्याने धुतले !

केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून स्वच्छता करणारे प्रशासन रस्ते कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्यासाठी का प्रयत्न करत नाही ?

कोरोना महामारीच्या काळात मुंबई महानगरपालिकेतील कोट्यवधी रुपयांचे घोटाळे मुख्यमंत्र्यांकडून उघड !

लोकप्रतिनिधींची घोटाळे करण्याची मानसिकता नष्ट करण्यासाठी संबंधितांना त्वरित आणि कठोर शिक्षा हवी !

मुंबई महापालिकेच्या २५ वर्षांच्या कारभाराचे लेखापरीक्षण करण्यात येईल ! – उदय सामंत, मंत्री

या प्रकरणी महापाकिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी १२ डिसेंबर या दिवशी येथे विधानसभेत दिली.

मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता !

बृहन्मुंबई महानगरपालिका मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करणार असल्याने त्या जलाशयाची ७ डिसेंबर या दिवशी पहाणी करण्यात आली. त्यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिकामा करण्यात आला होता.

मुंबई महानगरपालिकेकडून ३ सहस्र २६९ दुकाने आणि आस्थापने यांची पडताळणी !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारी १७६ दुकाने आणि आस्थापने यांवर कारवाई करण्यात आली.

कोरोना काळातील ४ सहस्र कोटी रुपयांचा हिशोब मुंबई महापालिकेकडे उपलब्ध नाही !

याविषयी मुंबई महापालिकेला काय म्हणायचे आहे ? हा हिशोब कधीपर्यंत सादर करणार, तेही पालिकेने सांगावे !

दुबईतील आस्‍थापनाशी संपर्क करून कृत्रिम पाऊस पाडू ! – मुख्‍यमंत्री

प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्‍यकता भासल्‍यास दुबईतील आस्‍थापनाशी संपर्क करून कृत्रिम पाऊस पाडू, असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले. पालिकेच्‍या कामांचा आढावा घेण्‍यासाठी ते स्‍वतः आणि पालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल उपस्‍थित होते.

Artificial Rain Mumbai : मुंबईत कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी लवकरच निविदा काढणार ! – डॉ. सुधाकर शिंदे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीप्रमाणे मुंबईतही कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

मुंबईतील रस्‍त्‍यांवर पाणी फवारणीसाठी १ सहस्र टँकर !

मुंबईत विविध ठिकाणी चालू असलेल्‍या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्‍य पसरू नये, यासाठी पाण्‍याची फवारणी करून रस्‍ते स्‍वच्‍छ करावेत.

३३ सहस्र ७४२ राजकीय, व्यावसायिक आणि धार्मिक बॅनर्स, फलक अन् भित्तीपत्रके हटवली !

इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचे विद्रूपीकरण होईपर्यंत महापालिका का थांबली होती ? ही कारवाई त्या त्या वेळीच का केली नाही ?