मुख्यमंत्र्यांचा बंगला थकबाकीदार सूचीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेने थकबाकीदार सूचीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे

कंगना राणावत यांचे कार्यालय पूर्ववत करून देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश.

या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे, ‘‘कंगना यांच्या कार्यालयाच्या नुकसानीचा व्यय मुख्यमंत्र्यांच्या खिशातून करावा. या सुडाच्या राजकारणाचा भुर्दंड सरकारी तिजोरीतून कशाला ?”

राजकारण म्हणून ‘हिंदुत्व’ करू नका  ! –  उद्धव ठाकरे

मुंबई महानगरपालिकेच्या भोवती आमची भक्कम तटबंदी आहे. ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल, त्यांनी डोके आपटून बघावे. मुंबई महापालिका शिवसेनेकडेच येईल-उद्धव ठाकरे

सर्वांसाठी लोकलचा निर्णय १५ डिसेंबरनंतर घेणार ! – आयुक्त

सर्वांसाठी लोकल सेवा चालू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतरच घेतला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. ‘टीव्ही-९ मराठी’ या वृत्तवाहिनीबरोबर साधलेल्या विशेष संवादाच्या वेळी ते बोलत होते.

कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोरोना वाढीला निमंत्रण !

कोरोना रुग्णांसाठी उपचार घेतांना एका साधकाला प्रशासकीय कारभाराविषयी आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा तूर्तास नाहीच – महापालिका आयुक्त

देहलीमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. मुंबईतही परिस्थिती चिंताजनक होतांना दिसत आहे. पाच मासांनंतर मुंबईत रुग्णसंख्या वाढली असून, दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील समुद्रकिनार्‍यांवर छठ पूजेला यंदा बंदी – मुंबई महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्रकिनार्‍यावर छठ पूजेला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी या वर्षी घरीच छठ पूजा साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई महापालिका सभागृहात जागेअभावी अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाचा नकार

भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे.

मुंबई महापालिकेचे नूतन आयुक्त चहल यांच्याकडून कामास प्रारंभ

इक्बालसिंह चहल यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून कामास प्रारंभ केला. त्यांनी नायर रुग्णालयाला भेट देत तेथील उपचार, तसेच रुग्णालयातील व्यवस्था आणि साधनसामुग्री यांचा आढावा घेतला.

चिकित्सालये बंद ठेवून नागरिकांची असुविधा करणार्‍या डॉक्टरांचे अनुमतीपत्र रहित करावे ! – मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि पालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे; मात्र झोपडपट्टी अन् वसाहती यांच्या परिसरात अनेक खासगी चिकित्सालयेे जाणीवपूर्वक बंद ठेवून नागरिकांची असुविधा केली जात आहे. अशा दायित्वशून्य डॉक्टरांचे अनुमतीपत्र रहित करावे