प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी वापरणार असल्याचा कर्नाटकचा दावा खोटा ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

कर्नाटक वारंवार धरणाचे बांधकाम पिण्याच्या पाण्यासाठी करत असल्याचा दावा करत असले, तरी कर्नाटकने पाण्याचा योग्य विनियोग कसा करता येईल यासंबंधी कोणतीही कृती केलेली नाही.

म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीचा खारटपणा वाढणार !

म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीच्या पाण्याची क्षारता वाढेल. त्यामुळे पश्चिम घाट आणि अन्य वनांतील वन्यजीव यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. म्हादईचे पाणी वळवल्याने विहिरी आणि अन्य जलस्रोत सुकणार आहेत.

कर्नाटकला प्रकल्पांसाठी संबंधित अनुज्ञप्त्या मिळू नयेत, यासाठी प्रयत्न करणार ! – महाधिवक्ता देविदास पांगम

कर्नाटक यापुढे म्हादईचे पाणी वळवू शकणार नाही आणि गोव्यासाठी ही जमेची बाजू आहे. आवश्यकता भासल्यास या प्रकरणी गोवा सरकार पुन्हा न्यायालयात दाद मागू शकणार आहे.

पणजी येथे म्हादईच्या संवर्धनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

मूक मोर्चा काढणार्‍या विद्यार्थ्यांनी ‘राज्यातील इतर विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे. म्हादईच्या संवर्धनाकडे सर्वांनी गंभीरतेने पहावे’, असे आवाहन विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या वेळी केले.

अनुज्ञप्ती न घेता बांधकाम न करण्याचा कर्नाटकला सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश

कर्नाटकच्या ‘डी.पी.आर्.’ला संमती मिळाली असली, तरी सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश हा गोव्याचे हित जपणारा आणि म्हादईचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.’’

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटककडून दादागिरी चालू आहे. यावरून गोमंतकीय पेटून उठलेले असतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक येथे जाऊन ‘विद्यमान भाजप सरकारच सत्तेवर आले पाहिजे’, असे सांगत आहेत.

सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ संघटनेची राज्यपालांकडे मागणी

म्हादई अभयारण्य व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता नाही. म्हादईप्रश्नी गोव्याची न्यायालयीन बाजू भक्कम आहे आणि म्हादईप्रश्नी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.- देविया राणे

म्हादई नदीचे पाणी वळवल्याने गोव्यावर होणार्‍या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार मंडळ नेमले जाणार !

गोवा सरकारने याचिकेत म्हादई वन्यजीव अभयारण्य, म्हादई आणि भीमगड अभयारण्य येथील पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाची सूत्रे मांडली आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हादईच्या संदर्भात गोव्याच्या बाजूने ठराव पारित

अखिल भारतीय स्थरावर दिग्गज मराठी साहित्यिकांच्या वतीने पारित झालेल्या या ठरावामुळे म्हादईसाठी चालू असलेल्या लढ्यात आमचे बळ वाढले आहे.’

गोव्याची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

म्हादईचे पाणी खोर्‍यातून बाहेर नेण्यास आमचा विरोध आहे; मात्र हे पाणी खोर्‍यातच ते वापरत असतील, तर त्यास आमची हरकत नाही.