पणजी येथे म्हादईच्या संवर्धनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

पणजी, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यातील विविध महाविद्यालयांतील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंट्स फॉर म्हादई’ या नावाखाली १३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी एकत्र येऊन पणजीतील गोवा विद्यापिठाचे वाचनालय ते आझाद मैदान या मार्गावरून मूक मोर्चा काढला. मूक मोर्चा काढणार्‍या विद्यार्थ्यांनी ‘राज्यातील इतर विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे. म्हादईच्या संवर्धनाकडे सर्वांनी गंभीरतेने पहावे’, असे आवाहन विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या वेळी केले.