कर्नाटककडून कळसानंतर आता भंडुरा प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण
कर्नाटक सरकार या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून गोव्याची जीवनदायिनी म्हणून गणल्या गेलेल्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमधील मलप्रभा नदीत वळवण्याच्या सिद्धतेत आहे. कर्नाटक सरकार धरण बांधून भंडुरा नाल्याचे २.१८ टी.एम्.सी. पाणी मलप्रभा नदीत वळवणार आहे.