नवी देहली – बंगालच्या गरिबांकडून घोटाळ्याच्या माध्यमांतून लुटलेले ३ सहस्र कोटी रुपये अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केले आहेत. हे पैसे त्या लोकांना परत केले जाण्यासाठी कायदा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार राजमाता अमृता राय यांच्याशी दूरभाषवर चर्चा करतांना पंतप्रधान मोदी यांनी राय यांना याविषयी सांगितले. तसेच याविषयी निवडणूक प्रचाराच्या वेळी लोकांना सांगण्यासही सांगितले. अमृता राय या राजघराण्यातील सदस्य आहेत.
Will make a law to return the 3,000 crore rupees looted from scams to the poor ! – PM Modi's assurance
The money seized from the accused in every scam ought to be returned to those concerned, and if a law is to be enacted regarding this, the public welcomes it !#BreakingNews… pic.twitter.com/hMDLgof0U1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2024
संपादकीय भूमिकाप्रत्येक घोटाळ्यातील आरोपींकडून जप्त केलेले पैसे संबंधितांना परत केले पाहिजेत आणि यासाठी कायदा होणार असेल, तर जनतेला आनंदच आहे ! |